वरूड ग्रामीण रुग्णालयात एकाच दिवशी 17 रुग्णांवर यशस्वी गर्भाशय शस्त्रक्रिया संपन्न #MJPJAY #PMJAY

\"\"

आज दिनांक – 11मे 2022 रोजी 17रुग्णांवर यशस्वी गर्भाशय शस्त्रक्रिया संपन्न
वरुड : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत वरुड ग्रामीण रुग्णालयात गर्भ पिशवी रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून शिबीर संपन्न झाले.

वरूड ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित शिबिरात तब्बल 17 गर्भ पिशवीशस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या.
या वेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ . प्रमोद पोतदार ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल देशमुख, सर्जन ,डॉ श्यामकुमार सिरसाम ,डॉ अंकुश अजमेरा ,डॉ प्रवीण देशमुख,डॉ प्रवीण ठाकरे,डॉ धीरज टेकोडे, डॉ समता चौधरी व भुलतज्ञ डॉ. पंकज बिजवे , डॉ रमेश डकरे यांनी कोरोनाच्या परिस्थितीत सुध्दा शासनाचे सर्व नियम पाळून हे शिबिर पार पाडले.
हे शिबिर, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवाने डॉ प्रशांत घोडाम जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ . रणमले, डॉ सचिन सानप, डॉ गजानन पांडे यांचे मार्गदर्शना खाली पार पडले तसेच ग्रामीण रुग्णालय वरूड येथील डॉ. प्रशांत शेळके, डॉ हर्षल भूबंर डॉ.घनश्याम मानकर ,वर्षा दारोकर,सोनाली ठाकरे, रुचिता वानखडे संदीप पवार, पुष्पा कावणे,काठाने इंदू धांडे, सागर झटले,आशिष पापडकर,सुनील नांदगावकर पाटील,ज्ञानेश्वर टाकले मंगेश सोनटक्के, निरंजन अढव, ललिता गवई, रविना अढव, हिराबाई वाघमारे महात्मा जोतिराव फुले जन व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजने तील राजेंद्र सावळकर, प्रमोद जिचकार दिनेश घ्यार सर्व अधिकारी व कर्मचारी शिबिराच्या यशस्वीतेकरीता यांनी अथक परीश्रम घेतले. शिबिराचे समारोप रुग्णांच्या वैयक्तिक भेटी घेऊन सविस्तरपणे माहिती देऊन करण्यात आली.

#महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना
#महात्मा_ज्योतिराव_फुले_जन_आरोग्य_योजना

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.