श्री धन्वंतरी आरती (मराठीत) खालीलप्रमाणे आहे:
कमलनयन शामवर्ण, पीतांबर साजे ।
मनमोहन वस्त्राने, आदिदेव विलसे ॥
शंखचक्र जलौका, अमृतघट हाती ।
चतुर्भुजांनी अवघ्या, दुःखाला पळवी ॥
जय देव, जय देव, धन्वंतरी देवा ।
सकळ जनांना द्यावा, आरोग्य ठेवा ॥ ध्रु. ॥
देवांनी दैत्यांनी, मंथन ते केले ।
त्यातून अमृत कलशा, घेऊनिया आले ॥
भय दुःख सरण्या, जरा मृत्यू हरण्या ।
सकळांना त्याचे, संजीवन झाले ॥
जय देव, जय देव, धन्वंतरी देवा ।
सकळ जनांना द्यावा, आरोग्य ठेवा ॥ १ ॥
शास्त्रांचे परिशीलन, अनुभव कर्माचा ।
बुद्धीने तर्काने, तत्पर ती सेवा ॥
शुचिर्दक्ष सत्यधर्म, संयत औदार्या ।
श्रीकांतासह साऱ्या, आशीर्वच द्यावा ॥
जय देव, जय देव, धन्वंतरी देवा ।
सकळ जनांना द्यावा, आरोग्य ठेवा ॥ २ ॥

