Health News

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची सेवा आता जिल्हा पातळीवर ! अधिक सुलभ व पेपरलेसअधिक सुलभ व पेपरलेस !

मुख्यमंत्री सहाय्यता निधी मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील गरजू रुग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. याअंतर्गत नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच आवश्यक सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष” सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भातील शासन निर्णय २२ जानेवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांना मोठा दिलासा नवीन निर्णयानुसार, नागरिकांना आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्यासाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. जिल्हा स्तरावरच अर्ज सादर करणे, त्यांची सद्यस्थिती जाणून घेणे, तसेच अर्जांवर आवश्यक कार्यवाही करणे शक्य होणार आहे. यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल. याशिवाय कक्षामार्फत अर्ज भरण्यास मदत, अर्जावरील स्थितीबाबत माहिती देणे आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पूर्णतः पेपरलेस प्रणाली मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रक्रियेला पूर्णतः पेपरलेस करण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी आणि आर्थिक मदतीसंदर्भात अर्जदारांना त्वरित माहिती उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली सुरू होईल. या प्रक्रियेमुळे नागरिकांना सेवा अधिक सुलभपणे आणि वेगाने मिळणार आहे. तज्ञ समितीची स्थापना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांचे पुनर्विलोकन होणार असून, गरजेनुसार नवीन रुग्णांना मदतीचा समावेश करण्यात येईल. याशिवाय, उपचार खर्चाचा आढावा घेतला जाईल आणि आर्थिक मदतीची रक्कम नव्याने निश्चित केली जाईल. “सीएमआरएफ पोर्टल” आणि “चॅरिटी पोर्टल”चे एकत्रिकरण रुग्णालये आणि नागरिकांना सेवा अधिक सुलभ व्हावी यासाठी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी ऑनलाईन प्रणाली” (सीएमआरएफ पोर्टल) आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली (चॅरिटी पोर्टल) यांचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे. अर्जांची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी एओ क्रमांक आणि एम क्रमांक एकत्र जोडले जातील. सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून आजवर हजारो गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य मिळाले आहे. या उपक्रमामुळे गरजू नागरिकांना त्यांच्या उपचारांसाठी नवा आशेचा किरण प्राप्त झाला आहे. राज्य शासनाने सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ गरजू रुग्णांनी अधिकाधिक प्रमाणात घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे. राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्याच्या या प्रयत्नामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची सेवा आता जिल्हा पातळीवर ! अधिक सुलभ व पेपरलेसअधिक सुलभ व पेपरलेस ! Read More »

Headline: JP Nadda Reaffirms Commitment to Healthier India on Ayushman Bharat\’s Sixth Anniversary

“Ayushman Bharat-PMJAY is the cornerstone of a stronger, Viksit Bharat,” says BJP President. Date: September 23, 2024 New Delhi: On the occasion of the sixth anniversary of Ayushman Bharat-Pradhan Mantri Jan Arogya Yojana (AB-PMJAY), BJP National President JP Nadda emphasized the importance of a healthy population in driving the prosperity of the nation. In a social media post, Nadda celebrated the achievements of the scheme, highlighting the collaborative efforts of the government, healthcare providers, and the public in shaping India\’s healthcare future. “A healthy population is better equipped to contribute to the country\’s growth, productivity, and innovation,” Nadda remarked. He described Ayushman Bharat as pivotal to the vision of \”Viksit Bharat,\” stressing its role in creating an inclusive and accessible healthcare system for all. Success of AB-PMJAY The Ayushman Bharat-PMJAY, launched in 2018, has provided free healthcare coverage to over 500 million beneficiaries across India, offering cashless treatment for secondary and tertiary care. Nadda praised the scheme for not only expanding healthcare access but also empowering the underserved populations, enabling millions to access critical medical services without financial burdens. Commitment to Healthcare for All On the scheme\’s anniversary, Nadda called for renewed dedication to building a compassionate healthcare system that ensures no one is left behind. \”Together, we will continue building a healthier India for generations to come,\” he stated. He further invited the public to read his detailed insights on Ayushman Bharat and India\’s healthcare journey in his latest article published by Hindustan Times, titled “Securing a Healthier Future for a Viksit Bharat.\” The full article can be accessed via the Hindustan Times website. Conclusion The AB-PMJAY scheme is a major milestone in India’s healthcare reforms, and on its sixth anniversary, leaders like JP Nadda reaffirm the government’s commitment to a healthier and more prosperous India. #ABPMJAY #Ayushman Bharat

Headline: JP Nadda Reaffirms Commitment to Healthier India on Ayushman Bharat\’s Sixth Anniversary Read More »

मोठी बातमी! ‘आयुष्यमान भारत’ योजनेतून आता रुग्णांना 1356 आजारांवर 5 लाखांचे मोफत उपचार, वाचा काय आहे नेमकी योजना, कोणाला मिळू शकतो लाभ आणि बनवून घ्या स्वतःच्या ‘आयुष्मान कार्ड’ स्वतःच !

नाशिक : आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना आता एकत्रितपणे राबविली जात असून त्यामधून प्रत्येक कुटुंबातील रुग्णास १३५६ आजारांवर मोफत उपचाराची संधी आहे. नवजात शिशुपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण या योजनेचा लाभ घेवू शकतात.रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन केंद्र व राज्य सरकारने प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक घटकाला शासनाच्या माध्यमातून मोफत उपचार मिळावेत, या हेतूने आयुष्यमान भारत योजनेचा निर्णय झाला. राज्य सरकारने गतवर्षी महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना एकत्रित राबविण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरदारापासून सामान्य व्यक्तींपर्यंत सर्वांनाच आता ही योजना लागू आहे. पिवळे, केशरी, शुभ्र रेशनकार्ड असलेल्या कुटुंबातील व्यक्ती देखील \’आयुष्यमान कार्ड\’ काढून योजनेचा लाभ घेवू शकतो. सध्या जिल्ह्यातील 78 रुग्णालयात या योजनेतून मोफत पाच लाखांपर्यंत उपचार मिळतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कुटुंबातील रुग्णाने गावातील ऑनलाइन सेवा केंद्रातून आशाताईंमार्फत आयुष्यमान कार्ड काढून घेणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर लाभार्थी स्वतः आहे मोबाईलवर आयुष्यमान ॲप डाऊनलोड करून स्वतःचे व आपल्या परिजनांचे आयुष्मान कार्ड बनवून घेऊ शकतात. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये 07 जिल्ह्यातील खासगी रुग्णालये 71 आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आयुष्यमान ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मोठी बातमी! ‘आयुष्यमान भारत’ योजनेतून आता रुग्णांना 1356 आजारांवर 5 लाखांचे मोफत उपचार, वाचा काय आहे नेमकी योजना, कोणाला मिळू शकतो लाभ आणि बनवून घ्या स्वतःच्या ‘आयुष्मान कार्ड’ स्वतःच ! Read More »

छत्रपती संभाजी नगर येथे वर्षभरात 26000 रुग्णांवर पाच लाखांपर्यंत मोफत उपचार # MJPJAY #PMJAY

छत्रपती संभाजी नगर येथे वर्षभरात 26000 रुग्णांवर पाच लाखांपर्यंत मोफत उपचार # MJPJAY #PMJAY Read More »

Take a look at this post… \’स्वतःच बनवा आपले व आपल्या परिवाराचे 5 लाखांचे आयुष्यमान कार्ड!\’.

http://healthsinfos.blogspot.com/2023/09/5.html

Take a look at this post… \’स्वतःच बनवा आपले व आपल्या परिवाराचे 5 लाखांचे आयुष्यमान कार्ड!\’. Read More »

Take a look at this post… \’स्वतःच बनवा आपले व आपल्या परिवाराचे 5 लाखांचे आयुष्यमान कार्ड!\’.

http://healthsinfos.blogspot.com/2023/09/5.html

Take a look at this post… \’स्वतःच बनवा आपले व आपल्या परिवाराचे 5 लाखांचे आयुष्यमान कार्ड!\’. Read More »

Take a look at this post… \’स्वतःच बनवा आपले व आपल्या परिवाराचे 5 लाखांचे आयुष्यमान कार्ड!\’.

http://healthsinfos.blogspot.com/2023/09/5.html

Take a look at this post… \’स्वतःच बनवा आपले व आपल्या परिवाराचे 5 लाखांचे आयुष्यमान कार्ड!\’. Read More »

लवकरच मिळणार पाच लाखापर्यंतच्या मोफत उपचारांचा लाभ

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानंतर सर्वसामान्य जनता आज लावून बसली होती. या मंत्रिमंडळ बैठकीत अत्यंत महत्त्वाचा असा महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना प्रति कुटुंब प्रति वर्ष पाच लाखांपर्यंतच्या उपचारांचे विमा कवच मिळण्याची घोषणा करण्यात आली होती व अशा अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणेच्या अंमलबजावणीसाठी सर्व जनता शासनाकडे अस लावून बसली होती. काल दिनांक 28 जुलै 2023 रोजी या संबंधि शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून यामुळे सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या शासन निर्णयामुळे सर्व बाधा दूर झाल्या असून आता जुन्या योजनेमधील बदल व सुधारणा करण्याकरिता मार्ग मोकळा झाला आहे ज्यामुळे लवकरच ही सुधारित योजना सर्वांकरिता लागू होऊ शकेल. कोणताही लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याकरता सर्वप्रथम राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याचा निर्णय होणे आवश्यक असते व त्यानंतर शासन निर्णय निर्गमित केला जातो व त्यानंतर तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येते जेणेकरून योजना राबविताना प्रत्यक्षात कोणत्याही अडचणी उद्भवू नयेत अशा तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर तत्काळ लाभार्थ्यांना लाभ मिळणे सहज शक्य होते. अशाच प्रकारे आता लवकरात लवकरच तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येऊन प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे नजीकच्या काळात शक्य होईल अशी माहिती योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत प्राप्त झाली आहे.

लवकरच मिळणार पाच लाखापर्यंतच्या मोफत उपचारांचा लाभ Read More »

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.