AYUSH

श्री धन्वंतरी आरती

श्री धन्वंतरी आरती (मराठीत) खालीलप्रमाणे आहे: कमलनयन शामवर्ण, पीतांबर साजे ।मनमोहन वस्त्राने, आदिदेव विलसे ॥शंखचक्र जलौका, अमृतघट हाती ।चतुर्भुजांनी अवघ्या, दुःखाला पळवी ॥जय देव, जय देव, धन्वंतरी देवा ।सकळ जनांना द्यावा, आरोग्य ठेवा ॥ ध्रु. ॥देवांनी दैत्यांनी, मंथन ते केले ।त्यातून अमृत कलशा, घेऊनिया आले ॥भय दुःख सरण्या, जरा मृत्यू हरण्या ।सकळांना त्याचे, संजीवन झाले ॥जय देव, जय देव, धन्वंतरी देवा ।सकळ जनांना द्यावा, आरोग्य ठेवा ॥ १ ॥शास्त्रांचे परिशीलन, अनुभव कर्माचा ।बुद्धीने तर्काने, तत्पर ती सेवा ॥शुचिर्दक्ष सत्यधर्म, संयत औदार्या ।श्रीकांतासह साऱ्या, आशीर्वच द्यावा ॥जय देव, जय देव, धन्वंतरी देवा ।सकळ जनांना द्यावा, आरोग्य ठेवा ॥ २ ॥

श्री धन्वंतरी आरती Read More »

राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते युनानी दिन 2025 व आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते युनानी दिन 2025 व आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन https://dhunt.in/YW9fP By Health’s Infos via Dailyhunt

राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते युनानी दिन 2025 व आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन Read More »

मोठी बातमी! ‘आयुष्यमान भारत’ योजनेतून आता रुग्णांना 1356 आजारांवर 5 लाखांचे मोफत उपचार, वाचा काय आहे नेमकी योजना, कोणाला मिळू शकतो लाभ आणि बनवून घ्या स्वतःच्या ‘आयुष्मान कार्ड’ स्वतःच !

नाशिक : आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना आता एकत्रितपणे राबविली जात असून त्यामधून प्रत्येक कुटुंबातील रुग्णास १३५६ आजारांवर मोफत उपचाराची संधी आहे. नवजात शिशुपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण या योजनेचा लाभ घेवू शकतात.रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन केंद्र व राज्य सरकारने प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक घटकाला शासनाच्या माध्यमातून मोफत उपचार मिळावेत, या हेतूने आयुष्यमान भारत योजनेचा निर्णय झाला. राज्य सरकारने गतवर्षी महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना एकत्रित राबविण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरदारापासून सामान्य व्यक्तींपर्यंत सर्वांनाच आता ही योजना लागू आहे. पिवळे, केशरी, शुभ्र रेशनकार्ड असलेल्या कुटुंबातील व्यक्ती देखील \’आयुष्यमान कार्ड\’ काढून योजनेचा लाभ घेवू शकतो. सध्या जिल्ह्यातील 78 रुग्णालयात या योजनेतून मोफत पाच लाखांपर्यंत उपचार मिळतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कुटुंबातील रुग्णाने गावातील ऑनलाइन सेवा केंद्रातून आशाताईंमार्फत आयुष्यमान कार्ड काढून घेणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर लाभार्थी स्वतः आहे मोबाईलवर आयुष्यमान ॲप डाऊनलोड करून स्वतःचे व आपल्या परिजनांचे आयुष्मान कार्ड बनवून घेऊ शकतात. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये 07 जिल्ह्यातील खासगी रुग्णालये 71 आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आयुष्यमान ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मोठी बातमी! ‘आयुष्यमान भारत’ योजनेतून आता रुग्णांना 1356 आजारांवर 5 लाखांचे मोफत उपचार, वाचा काय आहे नेमकी योजना, कोणाला मिळू शकतो लाभ आणि बनवून घ्या स्वतःच्या ‘आयुष्मान कार्ड’ स्वतःच ! Read More »

#Ayushman #Card Distribution & #Health #Camps #Nashik : #नाशिक जिल्हयात आजपासून #आयुष्यमान कार्ड वितरण मोहीम व #महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन

नाशिक : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्हयामध्ये १५ ते ३१ डिसेंबर २०२२२ पर्यंत महाआरोग्य  मिळावे घेण्यात येत आहेत. जिल्हाभरातील १०६ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ५९२ आरोग्य उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, यांच्या समन्वयातून हे शिबिर राबवले जाणार आहे. (Mahaarogya camps in district from today Nashik Health Camps) पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हयात महाआरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभाग, एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, जिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय यांच्या समन्वयाने हे शिबिर होणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी तयारी करण्यात येत आहे. या शिबिरात ग्रामीण भागातील रुग्णांची तपासणी आरोग्य उपकेंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. निदान व उपचार मोफत केले जाणार आहे. तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचेलाभार्थी असलेल्या लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड बनवून देणे करितामोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी सर्व स्तरावरून पोस्टर बॅनर यामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. या तपासण्या होतील! आरोग्य शिबिरामध्ये आरोग्य तपासणी हृदयरोग, रक्तदाब, डोळे तपासणी, मोतीबिंदू, टीबी ची तपासणी, दंतरोग, नाक कान घसा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, हाडांची तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये गुंतागुंत अथवा तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याची गरज भासल्यास संदर्भ सेवेची सेवा दिली जाणार आहे. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे, अशांसाठी जानेवारीमध्ये शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. जिल्हा परिषदेतील मुख्यालयातून या शिबिराचे सनियंत्रण केले जाणार असून शक्य तितक्या शस्त्रक्रिया ह्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य  योजने अंतर्गत करण्यात येणार आहेत. पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय परिवेक्षक त्या-त्या तालुक्यांना मार्गदर्शन करीत आहेत. शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या शिबिराचा लाभ जिल्हयातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हयाचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी, श्रीमती मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ कुलदीप शिरपूरकर, जिल्हा समन्वयक डॉ. पंकज दाभाडे, विभाग प्रमुख डॉ तुषार मोरे, जिल्हा प्रमुख डॉ राहुल सोनवणे व वैद्यकीय अधिकारी डॉ संकीत साखला यांनी केले आहे.

#Ayushman #Card Distribution & #Health #Camps #Nashik : #नाशिक जिल्हयात आजपासून #आयुष्यमान कार्ड वितरण मोहीम व #महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन Read More »

मनपा रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या टिमवर्कमुळे महिला रुग्णाचे प्राण वाचले, इंदिरा गांधी रुग्णालयातील घटना !

नाशिक : महानगरपालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्णांना तत्परतेने सेवा दिली जाते. सर्वच डॉक्टर आणि कर्मचा-यांची सेवाभाव वृत्ती नेहमीच अधोरेखीत झाली आहे. जिल्हयातील लखमापूरच्या एका 36 वर्षीय महिला रुग्णाच्या ऑपरेशननिमित्त पुन्हा एकदा मनपाच्या डॉक्टरांचं टीमवर्क दिसून आले. त्यामुळे सबंधित महिलेचे प्राण वाचले. पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात 27 ऑक्टोबरला गर्भपात करून संततीनियमनाच्या ऑपरेशनसाठी महिला दाखल झाली होती. या ऑपरेशन दरम्यान रुग्णास अतिरक्तस्राव होत असल्याने ऑपरेशन करणाऱ्या डॉ. सोनाली जोखडे यांनी त्वरीत इंदिरा गांधी हॉस्पिटलमधील स्त्री रोग तज्ञ डॉ. रीना काळदाते यांना बोलावून घेतले. दोन्ही डॉक्टरांनी मिळून रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु यश येत नसल्याने अखेर झाकीर हुसेन रुग्णालयातील जनरल सर्जन डॉ. नितीन रावते यांना बोलावण्यात आले. ते सुद्धा लगेचच हजर झाले. त्यांनीही रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु रुग्णाची प्रकृती बिघडत असल्याने आणि रक्तस्त्राव आटोक्यात येत नसल्याने स्त्री रोग तज्ज्ञ आणि मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांना बोलविण्यात आले. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन उपस्थित डॉक्टरांनी रुग्णाची गर्भपिशवी काढण्याचा निर्णय घेतला. तातडीने गर्भ पिशवी काढण्याचे ऑपरेशन करण्यात आले. त्यामुळे रक्तस्राव थांबून रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश आले. रुग्णाची प्रकृती बिकट झाल्याने गुंतागुंतीचे हे ऑपरेशन होते. मात्र सर्व डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे महिला रुग्णाचे प्राण वाचल्याचे डॉ. प्रशांत शेटे यांनी सांगितले. आता रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती त्यांनी दिली.  इंदिरा गांधी रुग्णालयातील भुलतज्ञ डॉ. स्नेहल भट आणि आपत्कालीन परिस्थितीत बोलावण्यात आलेल्या मनपाच्या नाशिक रोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील भुलतज्ञ डॉ. अर्चना बोधले यांचीही डॉक्टरांना मोलाची साथ लाभली. इंदीरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय देवकर यांनी परिस्थितीचे नियोजन केले. महिला रुग्णाच्या या ऑपरेशननिमित्त सर्व डॉक्टरांचे उत्तम टिमवर्क दिसून आले. यापुढेही सगळ्याच रुग्णांप्रती असाच सेवाभाव असणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सुचनेनुसार नागरिकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असणार असल्याचे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी म्हटले आहे.

मनपा रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या टिमवर्कमुळे महिला रुग्णाचे प्राण वाचले, इंदिरा गांधी रुग्णालयातील घटना ! Read More »

आयुष्यमान कार्डावर मिळेल पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार !

लाभ घ्या एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चा! पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिका धारक कुटुंब असाल तर आपल्याला मिळेल दीड लाखापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ! व आपण असाल आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी तर मिळेल पाच लक्ष रुपयांपर्यंतचा लाभ! आपण आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी आहात की नाही हे जाणून घेण्यासाठीMera PMJAYhttps://mera.pmjay.gov.in/search/loginअथवा Aapke Dwar Ayushmanhttps://aapkedwarayushman.pmjay.gov.in/AapkeDwar/ या वेबसाईटवर लॉगिन करा अथवा14555 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा आणि आपणरील योजनेचे लाभार्थी आहात की नाही हे तपासून बघा! आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठीआपल्याकडे आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे. आयुष्यमानहे आयुष्यमान कार्ड बनवून घेण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय अथवा योजनेमध्ये समाविष्ट रुग्णालये येथे जाऊन आपल्या आयुष्यमान कार्ड बनवून घ्या आणि उपचाराच्या खर्चापासून मुक्त व्हा! असे आवाहनएकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे नाशिक विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. कुलदीप शिरपूरकर यांनी केले आहे.

आयुष्यमान कार्डावर मिळेल पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार ! Read More »

नंदुरबार जिल्ह्यातील आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र समुदाय आरोग्य अधिकारी यांचे काम बंद आंदोलन

@healthschemeinfo #Ayushman Bharat Nandurbar: आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरु झाले असून जिल्‍ह्याची आरोग्‍य यंत्रणा कोलमडली आहे. आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र नंदुरबार जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यावर अन्याय होत असल्याचा दावा करत होणाऱ्या अन्यायाबाबत प्रशासनाने दखल घेतलेली नाही असा थापका ठेवून यामुळे समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांच्यावतीने जिल्हा परिषद (Zilha Parishad) कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हा परिषद (Nandurbar ZP) आरोग्य विभाग उपकेंद्र अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांना इन्सेंटिव्ह व हार्ड शिप आणि दरमहा मिळणारे वेतन वेळेत दिले जात नाही. सदर वेतन महिन्याच्या १० तारखेच्‍या आत द्यावे. या प्रमुख मागण्यासाठी समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद धरणे आंदोलन सुरू केले आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील ३४ आरोग्य उपकेंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. त्याचा समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाशी काही संबंध नाही असा दावा संघटनेचे अध्यक्ष डॉ. तुषार धामणे यांनी केला असल्याचे समजते. वेतन अदा समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेमुदत काम बंद धरणे आंदोलनामुळे आरोग्य सुविधेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारले असता. सदर कर्मचाऱ्यांना वारंवार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सेंटिव्ह व हार्डशिप व वेतन अदा केलेले आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या आर्थिक नियोजनानुसार सदर कार्यवाही सुरू आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अहवाल शनिवारी संध्याकाळी प्राप्त झाला असून लवकरच पुढील कार्यवाही देखील सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे कळत आहे. Ayushman Bharat HWC

नंदुरबार जिल्ह्यातील आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र समुदाय आरोग्य अधिकारी यांचे काम बंद आंदोलन Read More »

तानाजी सावंत महाराष्ट्राचे नवे आरोग्यमंत्री

यावेळाचे आरोग्यमंत्री पद सोलापूर जिल्ह्याला. नुकतेच महाराष्ट्राच्या मंत्री मंडळाचे खाते वाटप जाहीर झाले आहे. या खाते वाटपात सोलापूर जिल्ह्यातील परांडा येथील आमदार श्री तानाजी सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी आली आहे.

तानाजी सावंत महाराष्ट्राचे नवे आरोग्यमंत्री Read More »

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती परिषदेचे आयोजन

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना \”आरोग्यमंत्री आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणालेधर्मादाय रुग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते बदल केले जातील. यासाठी धर्मादाय कायद्यातील कलमात आवश्यक बदल करुन या योजनेसाठी किमान तीस टक्के खाटा उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करु.\” विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी धर्मादाय दवाखान्यातून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी काय करता येईल यावर विचार केला जाईल, असे सांगितले. दिव्यांग नागरिकांना तालुका स्तरावर दाखले देण्यासाठी व्यवस्था केली जावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती परिषदेचे आयोजन Read More »

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील डॉ. अंजली विष्णू हॉस्पिटल चे डॉ. अंजली धादवड व डॉ. विष्णू धादवड राज्यस्तरीय आरोग्य भुषण पुरस्काराने सन्मानित #MJPJAY #PMJAY

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील डॉ. अंजली विष्णू हॉस्पिटल चे डॉ. अंजली धादवड व डॉ. विष्णू धादवड यांना राज्यस्तरीय आरोग्य भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोविड काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनीच जिद्दीने व चिकाटीने रुग्णसेवा केली आहे. कोविड काळात सेवा देत असताना, कोविड च्या दुसऱ्या लाटेत जेव्हा सर्व शासकीय रुग्णालये कोविड हॉस्पिटल म्हणून राखीव करण्यात आली होती त्या काळात सदरील हॉस्पिटल मध्ये दुसऱ्या लाटेत सुमारे 200 हुन अधिक प्रसुती व 100 हुन अधिक क्रिटिकल नवजात बालकांना एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत सेवा देण्यात आली. स्त्रिरोग व बालरोग उपचारांसाठी फक्त सिन्नर शहरच नाही तर आजूबाजूच्या ४ ते ५ तालुके आणि २ जिल्हा साठी हक्काचे रेफरल सेंटर म्हणुन डॉ. अंजली विष्णू हॉस्पिटल ची ओळख आहे. रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्या सोबतच सामाजिक बांधिलकी जपत अनेक कार्यक्रम हॉस्पिटल तर्फे घेण्यात येतात जसे की मेडिकल कॅम्प, दरवर्षी सुदृढ बालक स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, शिक्षणासाठी मुलींना दत्तक घेणे व त्यांना दरमहा आर्धिक मदत करणे, आश्रम शाळेला वाचनालया साठी पुस्तके पुरविणे, शाळेतील वार्षिक कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणुन प्रेरणादायी भाषण देणे, तसेच किशोवयीन मुलींसाठी मार्गदर्शन करणे असे उपक्रम राबविले जातात.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील डॉ. अंजली विष्णू हॉस्पिटल चे डॉ. अंजली धादवड व डॉ. विष्णू धादवड राज्यस्तरीय आरोग्य भुषण पुरस्काराने सन्मानित #MJPJAY #PMJAY Read More »

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.