नंदुरबार जिल्ह्यातील आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र समुदाय आरोग्य अधिकारी यांचे काम बंद आंदोलन

@healthschemeinfo

#Ayushman Bharat

\"\"

Nandurbar: आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरु झाले असून जिल्‍ह्याची आरोग्‍य यंत्रणा कोलमडली आहे.

आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यावर अन्याय होत असल्याचा दावा करत होणाऱ्या अन्यायाबाबत प्रशासनाने दखल घेतलेली नाही असा थापका ठेवून यामुळे समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांच्यावतीने जिल्हा परिषद (Zilha Parishad) कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्हा परिषद (Nandurbar ZP) आरोग्य विभाग उपकेंद्र अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांना इन्सेंटिव्ह व हार्ड शिप आणि दरमहा मिळणारे वेतन वेळेत दिले जात नाही. सदर वेतन महिन्याच्या १० तारखेच्‍या आत द्यावे. या प्रमुख मागण्यासाठी समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद धरणे आंदोलन सुरू केले आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील ३४ आरोग्य उपकेंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. त्याचा समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाशी काही संबंध नाही असा दावा संघटनेचे अध्यक्ष डॉ. तुषार धामणे यांनी केला असल्याचे समजते.

वेतन अदा

समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेमुदत काम बंद धरणे आंदोलनामुळे आरोग्य सुविधेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारले असता. सदर कर्मचाऱ्यांना वारंवार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सेंटिव्ह व हार्डशिप व वेतन अदा केलेले आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या आर्थिक नियोजनानुसार सदर कार्यवाही सुरू आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अहवाल शनिवारी संध्याकाळी प्राप्त झाला असून लवकरच पुढील कार्यवाही देखील सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे कळत आहे.

Ayushman Bharat HWC

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top