नाशिक मधील इंदिरानगर येथे प्रेम मंदिर देखावा आणि आरोग्य शिबिराचे आयोजन
नाशिकच्या इंदिरानगर भागात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन
नाशिक मधील इंदिरानगर येथे प्रेम मंदिर देखावा आणि आरोग्य शिबिराचे आयोजन Read More »
नाशिकच्या इंदिरानगर भागात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन
नाशिक मधील इंदिरानगर येथे प्रेम मंदिर देखावा आणि आरोग्य शिबिराचे आयोजन Read More »
आरोग्याचा श्री गणेशा अंतर्गत सटाणा येथे आरोग्य शिबिर
‘श्री गणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत सटाणा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन Read More »
आयुष्यमान कार्ड मोहिमे करता नियोजन बैठक
नाशिक जिल्ह्यात “को-ब्रँडेड आयुष्मान कार्ड” विशेष मोहीम सुरू 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 – नागरिकांसाठी आरोग्य सुरक्षिततेचा मोठा उपक्रम नाशिक (दि. 19 ऑगस्ट 2025):आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) यांच्या एकत्रित अंमलबजावणी अंतर्गत “को-ब्रँडेड आयुष्मान कार्ड निर्माणाची विशेष मोहीम” नाशिक जिल्ह्यात 16 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला योजनांचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. कुलदीप शिरपूरकर यांनी आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले योजना याबाबत माहिती देऊन, आयुष्मान कार्डचे महत्त्व व मोहिमेचे उद्दिष्ट स्पष्ट केले आणि बैठकीची प्रस्तावना केली. आयुष्मान कार्डचे फायदे जिल्हाधिकारींचे निर्देश व निर्णय माननीय जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी बैठकीत पुढील निर्णय घेतले – सेवाभावी संस्था, एनजीओ व नागरिकांना आवाहन जिल्हाधिकारींनी आवाहन केले की – उपस्थिती नागरिकांसाठी संदेश 👉 नाशिक जिल्हा प्रशासनाचे स्पष्ट धोरण –✅ प्रत्येक घरासाठी आरोग्य सुरक्षा✅ आयुष्मान कार्ड – ५ लाखांपर्यंत मोफत उपचार✅ ज्येष्ठांसाठी वय वंदना कार्ड – अतिरिक्त ५ लाखांपर्यंत लाभ✅ एकूण १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की, विविध स्वयंसेवी संस्था, एनजीओ, सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक सेवाभावी संघटना यांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त नागरिकांचे आयुष्मान कार्ड तयार करून देण्यात मदत करावी. नागरिकांनी देखील स्वयंप्रेरणेने आयुष्मान भारत ॲपच्या मदतीने आपले व आपल्या कुटुंबीयांचे कार्ड तयार करावे. तसेच ज्यांना स्वतः कार्ड बनवणे शक्य होत नाही त्यांनी आपले सरकार सुविधा केंद्र, आशा स्वयंसेविका, रेशन दुकानदार यांच्याशी संपर्क साधून आपले कार्ड बनवून घ्यावे. योजनेत समाविष्ट असलेल्या दीडशेहून अधिक मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्येही आयुष्मान कार्ड बनविण्याची सोय उपलब्ध आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले की, नागरिकांनी या सोयीचा लाभ घेतला तर “मोफत आरोग्य सेवेचा कवच” प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे शक्य होईल.
जळगाव |सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने अंगदान – जीवन संजीवनी अभियान अंतर्गत ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवयवदान पंधरवडा साजरा केला जात आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ८ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद जळगाव येथे अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी व जिल्हास्तरीय समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते होते. त्यांच्यासह जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब वाबळे, आरोग्य विस्तार अधिकारी विजयकुमार विंचू, पीएचएन श्रीमती विद्या राजपूत, आरोग्य निरीक्षक राजेश कुमावत व संतोष मोरे तसेच जिल्ह्यातील सर्व आरोग्य सहाय्यक (HA) व आरोग्य सहाय्यिका (LHV) यांचा उपस्थितीत सहभाग नोंदविण्यात आला. या वेळी डॉ. रमेश धापते यांनी अवयवदानाचे सामाजिक व वैद्यकीय महत्त्व विषद करत उपस्थितांना जागरूकतेचा संदेश दिला. त्यांनी अवयवदानामुळे कित्येक रुग्णांचे प्राण वाचू शकतात, याचे प्रभावी उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी अवयवदान शपथ घेऊन या सामाजिक कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सर्व पातळीवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन समाजात अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचा वचने दिली.अशा प्रकारच्या उपक्रमामुळे समाजामध्ये अवयवदानाबाबत सकारात्मक विचारांची पेरणी होऊन अधिकाधिक लोक या पवित्र कार्यात सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नंदुरबार, ३ ऑगस्ट २०२५: ‘अवयवदान – माणुसकीचा सर्वोच्च सन्मान’ सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार राज्यभर ३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘अंगदान – जीवन संजीवनी अभियानाचा’ शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यात उत्साहात झाला. या उपक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील नर्सिंग महाविद्यालयात एक विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी त्यांनी आणि उपस्थित अधिकारी-कर्मचारी, नर्सिंग विद्यार्थी यांनी ‘अवयवदान’ करण्याची प्रतिज्ञा घेऊन समाजापुढे आदर्श घालून दिला. 🟣 कार्यक्रमाचे उद्दिष्ट:जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मरणोत्तर अवयवदान या विषयाविषयी जागृती निर्माण करणे, अंगदानासंबंधी गैरसमज दूर करणे व अधिकाधिक लोकांना अंगदानासाठी प्रोत्साहित करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. उपस्थित मान्यवर:• डॉ. नरेश पाडवी (अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक)• श्रीमती निलीमा वळवी (अधिसेविका)• प्राचार्य महेंद्र वळवी (नर्सिंग महाविद्यालय)• श्रीमती मनीषा बर्डे, श्री. निलेश शर्मा (जिल्हा समन्वयक)• श्रीमती प्रियांका ढिवरे (नेत्रदान समुपदेशक)• श्रीमती सरिता वसावे, श्री. गौरस सकटे, श्री. जितेंद्र चौव्हान, श्री. प्रसाद माळी, श्रीमती छाया गावीत, श्रीमती भागेश्री इंगळे श्री. मनोहर ढिवरे (जिल्हा पर्यवेक्षक – आरोग्य) यांनी प्रतिज्ञा वाचन केले. 🟢 प्रमुख ठळक मुद्दे:• सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली• अंगदानाच्या मानवी मूल्ये व नैतिकतेच्या आधारावर आधारित सामाजिक गरजांची चर्चा• अवयवदानामधील वैद्यकीय प्रक्रिया, गरज, आणि संधी यासंदर्भात माहिती उपक्रमांची रूपरेषा (३ ते १५ ऑगस्ट):जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावर जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये –✅ चर्चासत्रे✅ माहितीपर व्याख्याने✅ जनजागृती रॅली✅ अंगदान नोंदणी कॅम्प✅ विद्यार्थ्यांसाठी निबंध / पोस्टर स्पर्धा यांचा समावेश असेल. डॉ. विनय सोनवणे यांचे आवाहन:“अवयवदान ही माणुसकीची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे. एका व्यक्तीच्या मरणानंतरही अनेकांना जीवनदान देण्याची संधी ही समाजासाठी एक मोठे वरदान ठरते. या मोहिमेत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा व ‘मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प’ करून या समाजोपयोगी कार्यात योगदान द्यावे,” असे भावनिक आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांनी यावेळी केले. ‘अंगदान – जीवन संजीवनी अभियान’ हे वैद्यकीयदृष्ट्या जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सामाजिकदृष्ट्याही संवेदनशील आहे. नंदुरबार जिल्हा आरोग्य यंत्रणा या मोहिमेद्वारे अंगदानाच्या संदर्भातील सकारात्मक विचारांची बीजे रोवण्याचे कार्य करत आहे. #अंगदान2025 #LifeAfterLife #OrganDonationAwareness #अंगदानमाणुसकीचा_सन्मान #NandurbarForDonation #DonateOrgansSaveLives #ApledariJivantheva #OrganDonationWeek
नंदुरबार जिल्ह्यात ‘अंगदान – जीवन संजीवनी अभियान’ला उत्साही सुरुवात Read More »
जालना, ता. 30 जुलै 2025:जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘आरोग्यमित्रां’मार्फत ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व ‘वय वंदना योजना’ अंतर्गत लाभार्थ्यांची ई-केवायसी नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली असून, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने सर्व जनतेला या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, दिनांक 25 जुलै 2025 पर्यंत जालना जिल्ह्यात ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत एकूण 18 लाख 34 हजार लाभार्थी पात्र आहेत. यापैकी फक्त 6 लाख 34 हजार लाभार्थ्यांची कार्ड निर्मिती पूर्ण झाली आहे, तर उर्वरित 11 लाख 96 हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे ही प्रक्रिया त्वरीत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच केंद्र सरकारच्या ‘वय वंदना योजना’अंतर्गत वय वर्ष 70 किंवा त्याहून अधिक असलेल्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. वय वंदना योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या आजारांवर रु. 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार आयुष्यमान भारत योजनेप्रमाणेच ‘अंगीकृत खासगी व शासकीय रुग्णालयां’मध्ये मिळणार आहेत. ई-केवायसी नोंदणीसाठी ठिकाणे व वेळापत्रक: आरोग्यमित्र हे दर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी खालील शासकीय कार्यालयांमध्ये उपस्थित राहतील: तसेच आपल्या गावातील आशा स्वयंसेविका, स्वस्त धान्य दुकानदार, आपले सरकार सेवा केंद्र, आणि योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालये येथेही आरोग्यमित्र भेट देतील. या माध्यमातून नागरिकांनी आपली ई-केवायसी त्वरित करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आयुष्मान भारत योजनेविषयी थोडक्यात: ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून दि. 23 सप्टेंबर 2018 पासून महाराष्ट्रात ‘महत्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’सोबत एकत्रितपणे राबविली जात आहे. या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना रु. 1 लाखांपर्यंतचा मोफत उपचार शासकीय किंवा खासगी अंगीकृत रुग्णालयात मिळतो. वय वंदना योजना विषयी: ‘वय वंदना योजना’ अंतर्गत 70 वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांना रु. 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. या योजनेसाठी वेगळ्या प्रकारचे कार्ड दिले जात असून त्यासाठी सुद्धा ई-केवायसी आवश्यक आहे. नागरिकांना सूचना: ही संपूर्ण प्रक्रिया मोफत असून नागरिकांनी दलाल किंवा एजंटांकडे जाणे टाळावे.
एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे व्याप्ती लवकरच वाढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून कळाले आहे यामध्ये आजारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून रुग्णालयांच्या संख्येतही वाढ होणार आहे.
आरोग्य योजनेची व्याप्ती वाढण्याची शक्यता Read More »
🏥 मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या प्रेरणेने राज्यातील सर्व रुग्णालयांना सुवर्णसंधी! आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना – महात्मा फुले जन आरोग्य योजनांमध्ये सहभागी होण्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांचे खुले आवाहन महाराष्ट्रातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी आणि सामान्य जनतेला मोफत उच्च दर्जाच्या आरोग्य सेवांचा लाभ देण्यासाठी, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय आरोग्यमंत्री श्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रेरणेतून राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अण्णासाहेब चव्हाण यांनी राज्यभरातील सर्व खासगी व सरकारी रुग्णालयांना ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY)’ तसेच ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY)’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 🔹 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी किमान 30 खाटांची तर सिंगल स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी 10 खाटांची आवश्यकता आहे.🔹 ग्रामीण आणि दूरदराजच्या भागातील रुग्णालयांनीही पुढाकार घेऊन जनतेसाठी ह्या योजनांचा लाभ पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील सशक्त प्रयत्न राज्य शासनाच्या या व्यापक मोहिमेमध्ये प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (District Collector) — जे योजनेच्या सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आहेत — व जिल्हा शल्य चिकित्सक/अध्यक्ष तसेच सदस्य सचिव, सक्रियपणे रुग्णालयांना योजना समाविष्ट करण्याचे मार्गदर्शन करत आहेत. सामाजिक उत्तरदायित्वाचे भान! आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांनी समाजाच्या गरजांचा विचार करून, अल्पभुती व आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी या योजनांमध्ये सहभागी होणे ही केवळ जबाबदारी नाही, तर एक सामाजिक उत्तरदायित्व देखील आहे. लाभ काय? ✅ पॅनेलवर आल्यानंतर रुग्णालयांना शासकीय योजनांखाली अधिकाधिक रुग्ण मिळतात✅ शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार दर निश्चित केले जातात✅ डिजिटल क्लेम्स, पारदर्शक प्रक्रिया आणि निश्चित पेमेंट सायकल 📞 अधिक माहितीसाठी संपर्क साधा! ही केवळ योजना नव्हे, तर आपल्या रुग्णालयाच्या विकासाची, समाजसेवेची आणि आर्थिक स्थैर्याची एक मोठी संधी आहे!आजच पुढाकार घ्या… लोकसेवेच्या या यज्ञात सहभागी व्हा! योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता ऑनलाइन एप्लीकेशन करण्याकरता खालील लिंक वर क्लिक करा. https://www.jeevandayee.gov.in/MJPJAY/empanelment/Eligibility.jsp योजनेमध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व अटी यांसाठी जिल्हा समन्वयक (District Coordinator) व क्षेत्रीय व्यवस्थापक (Regional Manager) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा. जिल्ह्याचे नाव, जिल्हा समन्वयक आणि त्यांचा संपर्क क्रमांक तसेच विभागाचे नाव, क्षेत्रीय व्यवस्थापक आणि त्यांचा संपर्क क्रमांक यादी खालीलप्रमाणे आहे:जिल्हा समन्वयक (जिल्हानिहाय)
मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या प्रेरणेने राज्यातील सर्व रुग्णालयांना सुवर्णसंधी! Read More »