Title : दिनांक १५ मे रोजी परभणी महानगरपालिका क्षेत्रातील ४५ वर्षा पुढील नागरीकांना कोविशिल्ड लस

दिनांक १५ मे रोजी परभणी महानगरपालिका क्षेत्रातील ४५ वर्षा पुढील नागरीकांना कोविशिल्ड लस Check news on :https://postnw.com/57YA3e3aiw

दिनांक १५.०५.२०२१ रोजी परभणी #Parbhani महानगरपालिका क्षेत्रातील खाली नमूद सेंटरवर वय ४५ वर्षा पुढील नागरीकांना #Covishild कोविशिल्ड #Vaccine लसीचा पहिला डोस व दुसरा डोस देण्यात येणार आहे.

अ.क्र. लसीकरण केंद्राचे नाव
१. इनायत नगर, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र
२ साखला प्लॉट, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र
३ वर्मा नगर, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र
४ दर्गा रोड, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र
५ जायकवाडी रुग्णालय
६ शंकर नगर, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र
७ खंडोबा बाजार, नागरी प्राथमीक आरोग्य  केंद्र
८ खानापूर, नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र
९ बाल विद्यांमदीर हायस्कुल, नानल पेठ परभणी

महापालिकेचे कर्मचारी लसीकरण केंद्रावर स. ७.०० ते स. १०.०० वा. पर्यंत उपस्थित राहून नागरीकांना लसीकरणासाठी टोकन वाटप करणार आहेत.
तसेच टोकन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची RTPCR टेस्ट केली जाणार आहे.

तरी नागरीकांनी लसीकरण केंद्रावर स. ७.०० ते स. १०.०० वा. पर्यंत उपस्थित राहून RTPCR टेस्ट करूनच लसीकरणाचे टोकन प्राप्त करून घ्यावे.

टोकन प्राप्त नागरीकांनाच स. ११.०० वा. पासून ते दु. ४.०० वा. यावेळेत लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे.

तरी नागरीकांनी RTPCR टेस्ट करून घ्यावी व लसीकरणाचा लाभ घेऊन महानगर पालिकेस सहकार्य करावे. असे आवाहन परभणी महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top