Title : कोव्हिशिल्ड #Covishild लसीचा दुसरा डोस घेण्याचा कालावधी झाला ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे.

कोव्हिशिल्ड #Covishild लसीचा दुसरा डोस घेण्याचा कालावधी झाला ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे. Check news on :https://postnw.com/jmkbwv34Jy

केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या नव्याने आलेल्या आदेशानुसार दिनांक १५ मे २०२१ पासून नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना आता कोविशील्ड या लसीचा पहिला डोस घेतल्या नंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी हा ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे असा करण्यात आला आहे.

१५ मे २०२१ या तारखेच्या आधी कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना आता ८४ दिवस झाल्यानंतरच दुसरा डोस मिळणार आहे. शनिवार १५ मे पासून ज्या नागरिकांचे कोविशील्ड या लसचे पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले असतील अश्याच नागरिकांना कोविशील्ड लसचा दुसरा डोस मिळणार आहे.

कोवॅक्सिन या लसीचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे अंतर पूर्वी प्रमाणे २८ ते ४२ दिवसच राहणार आहे.

तरीही ज्या नागरिकांचे कोविशील्ड या लसचे ८४ दिवस पूर्ण झालेले नसतील अश्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये असे आवाहन नाशिक महानगरपालिका प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.

Scroll to Top