Buldhana

IMG 20250707 WA0031

कामात कुचराई करणाऱ्यांची गय नाही; शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

बुलढाण्यात आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत स्पष्ट निर्देश बुलढाणा, ४ जुलै:गोरगरीब आणि शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, माफक आणि सुलभ आरोग्य सेवा पोहोचवणे हे केंद्र सरकारचे मुख्य उद्दिष्ट असून, या उद्दिष्ट पूर्तीसाठी आरोग्य यंत्रणेला प्रामाणिकपणे कार्य करावे लागेल. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कोणतीही गय न ठेवता कठोर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित झालेल्या जिल्हास्तरीय आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री महोदयांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. बैठकीत प्रमुख उपस्थिती: मंत्री महोदयांचे महत्त्वाचे निर्देश: 🔹 रिक्त पदे तात्काळ भरा – जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये रिक्त पदांचा आढावा घेऊन आवश्यक ती भरती तातडीने पार पाडा.🔹 PMJAY अंतर्गत शिबिरे घ्या – आयुष्मान भारत योजनेंतर्गत ई-केवायसी व कार्ड नोंदणीसाठी ग्रामपंचायत व तालुकास्तरावर विशेष शिबिरे आयोजित करा.🔹 जन औषधी व अमृत औषधालये सुरू करा – जिल्हा रुग्णालयात तत्काळ सुविधा उपलब्ध करून द्या.🔹 नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई – आरोग्यसेवेत दोष आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल.🔹 ‘निक्षयमित्र’ योजनेत सर्वांचा सहभाग – क्षयरोग निर्मूलनासाठी स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचा सक्रिय सहभाग आवश्यक.🔹 ग्रामीण आरोग्य सुविधांची गुणवत्ता वाढवा – प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये भौतिक सुविधा आणि इमारती दर्जेदार असाव्यात.🔹 जन्मदर व मृत्युदराचा बारकाईने अभ्यास – सुधारणा आवश्यक त्या ठिकाणी त्वरित कृती करा. सर्व विभाग प्रमुखांना एकजूटने काम करण्याचे आवाहन मंत्री महोदयांनी सर्व आरोग्य यंत्रणेला सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन करत, “शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी कामात कुचराई खपवून घेतली जाणार नाही”, असा इशाराही दिला.

कामात कुचराई करणाऱ्यांची गय नाही; शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव Read More »

IMG 20250305 WA0007

“राजमाता महोत्सव: चविष्ट खाद्यपदार्थांची मेजवानी आणि आरोग्य जागरूकतेचा संगम”

राजमाता महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद खाद्यपदार्थांसह आयुष्मान भारत ई-केवायसी स्टॉल्सना नागरिकांची मोठी गर्दी बुलढाणा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे आयोजित राजमाता महोत्सव नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गजबजला आहे. जिजामाता प्रेक्षागार व क्रीडा संकुलात भरवलेल्या या महोत्सवात शनिवारी, सुट्टीच्या दिवशी, नागरिकांनी सहकुटुंब हजेरी लावली. या महोत्सवातील आकर्षक स्टॉल्स आणि वैविध्यपूर्ण पर्यायांमुळे हा महोत्सव खवय्यांसाठी खास पर्वणी ठरत आहे. महिला बचत गटांचे स्टॉल्स – चविष्ट पदार्थांची मेजवानी महोत्सवात विविध महिला बचत गटांनी आपल्या स्टॉल्सवर पारंपरिक व आधुनिक खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. खास करून ग्रामीण व पारंपरिक पदार्थांचा स्वाद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. विविध प्रकारच्या पाणीपुरी, चटकदार चाट आणि स्थानिक खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर मोठी गर्दी दिसून येत आहे. आरोग्य जागरूकतेसाठी ‘आयुष्मान भारत’ स्टॉल्स महोत्सवात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व ‘म. ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ अंतर्गत आरोग्य मित्र व आशा सेविका यांनी नागरिकांसाठी ई-केवायसी (e-KYC) नोंदणी सेवा उपलब्ध करून दिली. २६३ लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली, तसेच त्यांना योजनांची माहिती देण्यात आली. या योजनेअंतर्गत १३५६ गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळतात याची माहिती नागरिकांना देण्यात आली. नैसर्गिक उत्पादने आणि घरगुती वस्तूंच्या स्टॉल्सना भरघोस प्रतिसाद खाद्यपदार्थांशिवाय महोत्सवात गहू, तांदूळ, भाजीपाला, मसाले आणि अन्य घरगुती उपयोगाच्या वस्तूंचे स्टॉल्स आकर्षण ठरत आहेत. नागरिक या स्टॉल्सवर खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. महोत्सवामुळे उत्साहाचे वातावरण राजमाता महोत्सवामुळे बुलढाण्यात उत्साहाचे वातावरण असून, स्थानिक उद्योजक, महिला बचत गट आणि नागरिक यांच्यात सकारात्मक ऊर्जा संचारली आहे. सुट्टीच्या दिवशी हा महोत्सव अधिकच गजबजला असून, येत्या दिवसांत याला आणखी चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.

“राजमाता महोत्सव: चविष्ट खाद्यपदार्थांची मेजवानी आणि आरोग्य जागरूकतेचा संगम” Read More »

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.

Scroll to Top