गो-विज्ञान संशोधन केंद्र व देवलापार आदिवासी आश्रमशाळेला भेट — MJPJAY/PMJAY योजनेच्या जनजागृतीचा उपक्रम

देवलापार, नागपूर :महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने योजनेच्या अधिकाऱ्यांनी देवलापार परिसरातील विविध संस्थांना भेट देऊन योजनेची माहिती व प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी गो-विज्ञान अनुसंधान केंद्र, गौतीर्थ, देवलापार येथे भेट देण्यात आली. केंद्रामार्फत सुरू असलेले गो-विज्ञान संशोधन, गो-आधारित शेती, गो-चारा सशक्तीकरण तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली व संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची माहिती देऊन आयुष्यमान कार्ड बनविणे करण प्रवृत्त करण्यात आले. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांच्या जीवनमानाशी संबंधित उपक्रमांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून त्यांचे आयुष्मान कार्ड बनविणे करता काय उपयोग योजना राबवता येथील यावर सखोल चर्चा व विचार मंथन करण्यात आले.त्यानंतर देवलापार येथील आदिवासी वस्ती व आश्रमशाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थी, शिक्षक तसेच संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. विशेषतः आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना MJPJAY/PMJAY अंतर्गत मिळणाऱ्या मोफत व कॅशलेस आरोग्यसेवेचा लाभ अधिकाधिक मिळावा, यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.यावेळी पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड, ई-केवायसी, उपलब्ध आरोग्य सुविधा, अंगीकृत रुग्णालये आणि योजनेअंतर्गत मिळणाऱ्या उपचारांची माहिती करून घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. गरजू रुग्णांना उपचार घेताना आर्थिक अडचण निर्माण होऊ नये आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, हा या भेटीमागील प्रमुख उद्देश होता. यावेळी योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. कुलदीप शिरपूरकर, जिल्हा समन्वयक डॉ. विश्वदीप नगरकर, योजनेचे क्लस्टर हेड पियुष चाफेकर, जिल्हा प्रमुख श्री राजू चव्हाण हे उपस्थित होते.“शासनाच्या आरोग्य योजना केवळ कागदावर न राहता, त्यांचा प्रत्यक्ष लाभ आदिवासी, ग्रामीण व दुर्गम भागातील प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचणे हीच खरी जनसेवा आहे,” या भावनेतून या भेटीदरम्यान योजनेच्या अधिकाऱ्यांमार्फत विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.या भेटीमुळे गो-संवर्धन, ग्रामीण विकास आणि आदिवासी भागातील आरोग्य जनजागृती या तीनही क्षेत्रांशी संबंधित प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेता आली. MJPJAY/PMJAY योजनेचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रत्यक्ष भेटी आणि जनजागृती उपक्रमांना विशेष महत्त्व आहे

Scroll to Top