उद्योग मित्र संस्थेच्या वतीने #नाशिक जिल्हा रुग्णालयास #व्हेंटिलेटर प्रदान

#Nashik कोरोना महामारीशी लढा देताना स्वयंसेवी संघटना असो शासनाचे विभाग असो सर्वांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. या प्रयत्नांना बळ देण्यासाठी नाशिकचे उद्योजक सुद्धा पुढे आलेले आहेत. उद्योग मित्र संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक मधील प्रसिद्ध कंपन्यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे. उद्योग मित्र संस्थेचे अध्यक्ष तसेच भाजपा उद्योग आघाडी चे प्रदेशाध्यक्ष श्री प्रदीप पेशकार व या मदत उपक्रमाचे प्रकल्पप्रमुख श्री आनंदराव सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून विविध कंपन्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.
संस्थेच्या वतीने जिल्हा ग्रामीण रुग्णालय तसेच मनपा आयुक्त व संबंधित अधिकारी यांना विचारणा करून कोणत्या उपकरणांची आवश्यकता आहे ते साहित्य लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले.
आज नाशिक जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयासाठी #Ventilator व्हेंटिलेटर ची पहिली खेप मा.खा. डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी श्री सुरज मांढरे व जिल्हा शल्यचिकित्सक श्री अशोक थोरात यांच्याकडे सुपूर्द केली.
यामुळे काही तालुक्यांच्या वैद्यकीय व्यवस्थेत भर पडून ग्रामीण भागातील रुग्णांना यांचा लाभ होईल अशी आशा आहे.असे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी यांनी संस्थेचे व उद्योजकांचे आभार मानले.
डॉक्टर श्री अशोक थोरात यांनी तिसऱ्या लाटे साठी या व्हेंटिलेटर चा उपयोग लहान मुलांसाठी सुध्दा होऊ शकेल असे सांगितले. याप्रसंगी शहर अध्यक्ष श्री गिरीश पालवे ,उद्योजक किशोर राठी , अंकीत राठी, आनंदराव सुर्यवंशी, जगदीश शास्त्री ,अमित आदी उपस्थित होते.
उद्योग मित्र संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ॲडव्हान्स एंजाइम लि.चे श्री के एल राठी जिंदाल साॅ लि. चे श्री सिन्हा , इनोवा रबर प्रा.ली.चे श्री हेमंत बक्षी, एम एस एस इंडिया चे श्री मंगेश नाटाळ, नॅशनल रोबोटिक्स चे श्री अशोक खत्री व श्री केवलरामानी आधी उद्योजकांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला. या निधीच्या उपयोगातून व्हेंटिलेटरर्स , ऑक्सीजन प्लांट व आयसोलेशन सेंटर आधी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या उपक्रमात इतर उद्योगांनीही सहभागी व्हावे असे आवाहन उद्योग मित्र संस्थेचे अध्यक्ष श्री प्रदीप पेशकार व उद्योग मित्र संस्थेचे प्रकल्पप्रमुख सूर्या ग्रुपचे आनंदराव सूर्यवंशी यांनी केले आहे.

Scroll to Top