\”हर घर तिरंगा\” मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन #AmritMahotsav #HarGharTiranga

हृदय देश प्रेमाने ओतप्रोत झाले आहे?
परंतु
हे प्रेम व्यक्त कसं करावं हे कळत नाहीये?
तर मग या
#harghartiranga #HarGharTiranga
मोहिमेत सामील व्हा!
घाबरताय! काही चुकले तर म्हणून!
तर मग बघा हे व्हिडिओ
आणि बिनधास्त फडकवा तिरंगा!
भारत माता की जय!

\"\"

आजादी का अमृत महोत्सव या शीर्षकाखाली भारत देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करीत आहे. ही प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.
या निमित्ताने शासनाने भारताचा राष्ट्रध्वज अर्थात तिरंगा फडकविण्याच्या नियमांमध्ये शिथिलता दिली असून जास्तीत जास्त नागरिकांनी घरोघरी तिरंगा लावावा व देशा प्रति सार्थ अभिमान जागवावा हा उदात्त हेतू या मागे आहे.
तरीही अजूनही बऱ्याच नागरिकांना तिरंगा लावण्याची भीती वाटते त्यामुळे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की वाचकांनी खालील लिंक वर क्लिक करावे जेणे करून आपण शासनाच्या अधिकारिक वेबसाईट वर पोहोंचाल.
सदर अधिकारिक वेबसाईट वर अत्यंत सोप्या भाषेत द्रुक श्राव्य अर्थात व्हिडिओ स्वरूपात माहिती दिली आहे.


https://harghartiranga.com/

सदरील माहिती मुळे सर्व शंकांचे निरसन होईन व नागरिकांना वाटणारी तिरंगा लावण्याची भीती संपुष्टात येईल आणि सर्व नागरिक मुक्त भावनेने घरोघरी तिरंगा फडकवतील.
या सोबतच शासनाने नागरिकांचे तिरंगा फडकविल्या नंतरच्या सेल्फी मागविले आहेत व अशा सर्व सेल्फींचा एकत्रित डिजिटल तिरंगा वेबसाईटवर दिसणार आहे त्यासाठी पुढील लिंक बघावी व सोबत जोडलेले व्हिडिओ बघावेत.

https://harghartiranga.com/digital-tiranga

तिरंगा कसा लावावा
तिरंगा कसा लावावा

कुठे मिळेल तिरंगा?

आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये रेशन दुकानावर अथवा खादी ग्रामोद्योगच्या सेवा केंद्रांवर तिरंगा उपलब्ध आहे याशिवाय ऑनलाइन पद्धतीने ही आपण तिरंगा मागवू शकता. तर मग चला न घाबरता फडकवू या तिरंगा!

भारत माता की जय! वंदे मातरम्!

\"\"

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.