#Nashik शहरात कामाचे ठिकाणी ही मिळणार आता #COVID ची लस


केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संघटित क्षेत्रांसाठी ज्यामध्ये शासकीय व खाजगी कार्यालय उत्पादन क्षेत्र,सेवा क्षेत्र इत्यादी अंतर्गत येणाऱ्या ४५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या ऑफिस कार्यालयामध्ये कामाचे ठिकाणीच आता लसीकरण करून मिळणार आहे त्यादृष्टीने जिल्हा व मनपा प्रशासनाच्या वतीने नियोजन केले जात असल्याची माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. १ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना कोविडचे लसीकरण सुरू झाले आहे.त्यामध्ये आता आपले कामाचे ठिकाणी ही लसीकरण करून मिळणार आहे.केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संघटित क्षेत्रांसाठी ज्यामध्ये शासकीय व खाजगी कार्यालय उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र इत्यादी अंतर्गत येणाऱ्या ४५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या ऑफिस कार्यालयामध्ये कामाचे ठिकाणीच आता लसीकरण करून मिळणार आहे. याबाबत केंद्र शासनाने राज्य सरकारला कळविले आहे की आता कोवीड-१९ चे लसीकरण आता शासकीय व खाजगी कार्यालयातील जी व्यक्ती लसीकरणास पात्र आणि लस घेण्याची इच्छा असणारे कर्मचारी आहेत अशा आस्थापना, जवळील सद्यस्थितीतील शासनाने मान्यता दिलेल्या कोवीड लसीकरण केंद्राशी जोडून कार्यान्वित करता येणार आहे.यासाठी डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सने नियोजन करून ज्या शासकीय किंवा खाजगी आस्थापना इच्छुक आहेत त्यांचेशी समन्वय साधावयाचा आहे. सदर आस्थापनेवरील वरिष्ठ अधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून निर्देशित होतील व त्यांनी या लसीकरण मोहिमेसाठी जवळील कोवीड लसीकरण केंद्राशी समन्वय ठेवायचा आहे. यामध्ये सध्या केवळ ४५ वर्षावरील कर्मचारीच पात्र असणार आहेत, आस्थापने बाहेरील अथवा नातेवाईक यांना ही सोय उपलब्ध नसणार आहे. शासकीय आस्थापनावरील लसीकरण केंद्र हे जवळील शासकीय कोवीड लसीकरण केंद्राला संलग्न असेल.खाजगी आस्थापना लसीकरण केंद्र जवळील सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या मान्यता प्राप्त खाजगी कोवीड लसीकरण केंद्राशी संलग्नित असेल व या कार्यालयीन लसीकरण केंद्राची लस, आरोग्य कर्मचारी टीम पुरविण्याची जबाबदारी सदर केंद्राची असणार आहे.शासकीय कार्यालयातील लसीकरण मोफत असणार असून, खाजगी कार्यालयांमध्ये होणाऱ्या लसीकरणासाठी प्रति कर्मचारी २५० रुपये शुल्क असणार आहे.
यामुळे सद्यस्थितीतील कोवीड लसीकरण केंद्रावर पडणारा ताण तसेच होणारी गर्दी याला काही प्रमाणात आळा बसून लसीकरणामध्ये काहीशी सुसुत्रता येण्यास मदत होईल तरी खाजगी अशा आस्थापना यांनी त्यांचे कर्मचारी वर्गाचे शासन निर्णयाचे पालन करून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नाशिक महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top