“एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना” या विषयावर तालुकास्तरीय सभा संपन्न


घाटंजी (प्रतिनिधी) : आज दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी पंचायत समिती सभागृह, घाटंजी येथे “एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना” या विषयावर तालुकास्तरीय सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेचे अध्यक्षस्थान गटविकास अधिकारी (पं. स. घाटंजी) श्री. गजानन पिल्लेवाड साहेब यांनी भूषविले.
सभेमध्ये डॉ. भोसीकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय कामाचा आढावा घेतला. त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. कामात अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक (स्त्री/पुरुष), गटप्रवर्तक आणि आशा सेविका यांना मार्गदर्शन केले.
या योजनेचा उद्देश गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना आरोग्य सेवांचा लाभ मिळवून देणे आहे. त्यामुळे सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून काम करण्याचे आवाहन श्री. पिल्लेवाड साहेब यांनी केले.
सभेला वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक (स्त्री/पुरुष), गटप्रवर्तक आणि आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वांनी या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले. ही सभा योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि भविष्यात अधिक चांगले काम करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.

Scroll to Top