#Ayushman #Card Distribution & #Health #Camps #Nashik : #नाशिक जिल्हयात आजपासून #आयुष्यमान कार्ड वितरण मोहीम व #महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन

\"\"

नाशिक : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्हयामध्ये १५ ते ३१ डिसेंबर २०२२२ पर्यंत महाआरोग्य  मिळावे घेण्यात येत आहेत. जिल्हाभरातील १०६ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ५९२ आरोग्य उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, यांच्या समन्वयातून हे शिबिर राबवले जाणार आहे. (Mahaarogya camps in district from today Nashik Health Camps)

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हयात महाआरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभाग, एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, जिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय यांच्या समन्वयाने हे शिबिर होणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी तयारी करण्यात येत आहे. या शिबिरात ग्रामीण भागातील रुग्णांची तपासणी आरोग्य उपकेंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. निदान व उपचार मोफत केले जाणार आहे. तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचेलाभार्थी असलेल्या लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड बनवून देणे करितामोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी सर्व स्तरावरून पोस्टर बॅनर यामार्फत जनजागृती करण्यात येत आहे.

या तपासण्या होतील! आरोग्य शिबिरामध्ये आरोग्य तपासणी हृदयरोग, रक्तदाब, डोळे तपासणी, मोतीबिंदू, टीबी ची तपासणी, दंतरोग, नाक कान घसा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, हाडांची तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये गुंतागुंत अथवा तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याची गरज भासल्यास संदर्भ सेवेची सेवा दिली जाणार आहे. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे, अशांसाठी जानेवारीमध्ये शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. जिल्हा परिषदेतील मुख्यालयातून या शिबिराचे सनियंत्रण केले जाणार असून शक्य तितक्या शस्त्रक्रिया ह्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य  योजने अंतर्गत करण्यात येणार आहेत.

पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय परिवेक्षक त्या-त्या तालुक्यांना मार्गदर्शन करीत आहेत. शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या शिबिराचा लाभ जिल्हयातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हयाचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी, श्रीमती मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ कुलदीप शिरपूरकर, जिल्हा समन्वयक डॉ. पंकज दाभाडे, विभाग प्रमुख डॉ तुषार मोरे, जिल्हा प्रमुख डॉ राहुल सोनवणे व वैद्यकीय अधिकारी डॉ संकीत साखला यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top